मुंबई : सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. जेव्हा ती सोशल मीडियावर पोस्ट करते तेव्हा तिचे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. पण नुकतीच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या ‘खतरा-खतरा’ या शोमध्ये पाहुणी म्हणून आलेली सोनाक्षी सिन्हा तिच्या एका चाहत्याच्या कृत्याने इतकी घाबरली की तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. इतकंच नाही तर अभिनेत्रीच्या चाहत्याने तिला धमकीही दिली होती की मी जीव देईन.
व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा व्हॅनिटी व्हॅन रूममध्ये आहे, जी भारतीची आहे. सोनाक्षी सिन्हा व्हॅनिटीमध्ये बसलेली भारतीची वाट पाहत आहे, त्याचवेळी एक फॅन बाथरूममधून बाहेर येतो, त्याला पाहून सोनाक्षी सिन्हा त्याला विचारते, तू इथे काय करतो आहेस? त्याला उत्तर देताना तो चाहता म्हणतो की, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे आणि मी तुमचे नाव हातावर गोंदवले आहे. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. चाहत्याचा असा जोश पाहून सोनाक्षी सिन्हा थोडी घाबरलेली दिसली. मात्र यावर सोनाक्षी काहीच बोलली नाही, मग तेव्हा फॅन तिला म्हणतो की, जर तू मला समजून घेतलं नाहीस तर मी माझा जीवही देईन.
सोनाक्षीबद्दलच्या प्रेमाचा दाखला देत चाहत्याने खिशातून चाकू काढून मानेला लावताच सोनाक्षी सिन्हा भडकली आणि ओरडू लागली. पण जर तुम्ही विचार करत असाल की सोनाक्षीची चाहत्यांची क्रेझ इतकी खरी आहे, तर तसे अजिबात नाही. वास्तविक, खत्रा-खत्राचे होस्ट आणि निर्माते भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया आणि फराह खान यांनी सोनाक्षी सिन्हासोबत हा प्रँक केला होता. कलर्सने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोनाक्षी सिन्हा या आठवड्यात खत्रा खत्रामध्ये गेम खेळताना दिसणार आहे.