मुंबई : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अली बॉलिवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. सोमीचा चित्रपटांमध्ये दिसण्याचा कोणताही विचार नाही. सोमीने 17 वर्षांची असताना सलमानला डेट करायला सुरुवात केली होती. 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, नंतर तिने सलमानवर फसवणूक केल्याचा आरोप केला आणि त्यांचे ब्रेकअप झाले. दरम्यान, सोमीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने सलमान विषयी भाष्य करत त्याच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

सोमीने सलमान खानच्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सलमानचा ‘बॉलिवुड हार्वे विन्स्टन’ असा उल्लेख केला आहे. सोमीने कोणाचेही नाव घेतले नसले तरी. यात तिने थेट सलमानवर निशाण साधल्याचे दिसत आहे. सोमी अलीने तिच्या या पोस्टमध्ये ऐश्वर्या राय बच्चनला टॅग केले आहे. तिने शेअर केलेले पोस्टर सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाचे सिल्हूट फोटो आहे.

हा फोटो पोस्ट करत सोमीने लिहिलं की, ‘बॉलिवुडचा हार्वे विन्स्टन. तुम्ही एक दिवस उघड व्हाल. ज्या महिलांचे तुम्ही शोषण केले त्या एक दिवस बाहेर येतील आणि त्यांचे सत्य सांगतील, जसे ऐश्वर्या राय…’ असे सोमीने या पोस्टमध्ये लिहत सलमानला धमकी दिली आहे.