Ashneer Grover
Ashneer Grover

माजी MD Ashneer Grover यांना अलीकडेच Fintech स्टार्टअप BharatPe मधून बाहेर काढल्यानंतर ते सार्वजनिक मंचावर दिसले. शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या स्टार्टअप आधारित रिअॅलिटी शोमुळे लोकप्रिय झालेला ग्रोव्हर हे यावेळी युट्यूबवर एका कॉमेडी व्हिडिओमध्ये दिसले. या वेळी त्याने शार्क टँक इंडिया शोमध्ये ‘ग्रॉस प्रॉडक्ट (Gross product)’ म्हणून वर्णन केलेल्या उत्पादनात गुंतवणूक न केल्याबद्दल खंत व्यक्त केली.

वास्तविक शार्क टँक इंडिया शोमधील तरुण सहभागी रोहित वॉरियर (Rohit Warrior) ने आपली कल्पना मांडली आणि सर्वांसमोर एक विचित्र उत्पादन ठेवले. रोहितची स्टार्टअप कंपनी सिपलाइन (Sipline) एक उत्पादन बनवते, ज्याचे त्याने ग्लास मास्क असे वर्णन केले आहे.

त्याला पाहताच ग्रोव्हर हे संतापले. ग्रोव्हर यांनी स्वतःला न आवरता कठोरपणे म्हणाले कि, ‘काय विनोद? तू खूप पितोस का? म्हणजे काचेवर मास्क लावायची कल्पना कुठून आली?’ हे उत्पादन पाहून बाकीच्या न्यायाधीशांनाही हसू आवरता आले नाही.

भारतपेशी संबंधित प्रदीर्घ वादानंतर जेव्हा ग्रोव्हर या व्हिडिओमध्ये कॉमेडियन रोहन जोशी (Rohan Joshi) आणि साहिल शाह (Sahil Shah) सोबत दिसला तेव्हा त्याला सिपलाइनबद्दल विचारण्यात आले. शहा यांनी ग्रोव्हरला विचारले, ‘सिपलाइनमध्ये गुंतवणूक न केल्याबद्दल तुम्हाला काही पश्चाताप आहे का?’

उत्तरात, ग्रोव्हर म्हणाले की, हो मला आहे पश्चाताप, परंतु याचे कारण असे आहे की, त्यांनी आयुष्यातून बरेच मनोरंजन गमावले आहे. पुढे ते म्हणाले कि, ‘माझ्याकडून त्या कंपनीत गुंतवणुकीची चूक झाली असती आणि पाच नवीन गोष्टी करायला सांगितल्या तर मी हसून वेडा झालो असतो.’

ग्रोव्हर हे गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडले आहे. ग्रोव्हर यांचा एक ऑडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण वाद सुरू झाला. या क्लिपमध्ये ग्रोवर कोटक महिंद्रा बँकेच्या कर्मचाऱ्याला IPO मध्ये प्राधान्य वाटप न मिळाल्याबद्दल गैरवर्तन करताना दाखवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जरी नंतर ग्रोव्हर यांनी ट्विट केले की, व्हायरल क्लिप बनावट आहे, परंतु नंतर त्यांनी स्वतः ते ट्विट हटवले. यानंतर ग्रोव्हरवर त्यांची पत्नी माधुरी जैन आणि त्यांच्या नातेवाईकांवर भारतपे निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

अनेक महिन्यांच्या नाट्यमय घडामोडीनंतर, भारतपे बोर्डाने अखेर ग्रोव्हरची कंपनीतून हकालपट्टी केली. मात्र भारतपेमध्ये ग्रोव्हरची हिस्सेदारी अजूनही आहे.