मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. हे कपल याच महिन्यात लग्न करणार असल्याची सूनत्रांकडून माहिती मिळाली असली तरी यावर भट्ट किंवा कपूर कुटुंबाकडून आणखी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. यासोबतच आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न कोणत्या ठिकाणी होणार हेही सांगण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी 1980 मध्ये आरके हाऊसमध्ये लग्न केले होते. त्याच्या पालकांप्रमाणेच रणबीर कपूरही एप्रिलमध्ये आलिया भट्टसोबत कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये लग्न करणार आहे. माहितीनुसार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला 450 लोक उपस्थित राहणार आहेत. रणबीर कपूरच्या कुटुंबीयांना एप्रिलच्या शेवटी लग्न करायचे होते, परंतु अभिनेत्रीचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांची तब्येत बिघडल्यामुळे आलिया भट्टच्या कुटुंबातील सदस्यांना लवकर लग्न करायचे आहे.

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. नुकतंच, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी बनारसमध्ये चित्रपटाचे शेवटचे शूट केले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूरशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.