Smoking
Smoking

धूम्रपानाचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे शरीरात अनेक समस्या आणि आजार होतात. तुम्ही धुम्रपान (Smoking) करणार्‍या बर्‍याच लोकांचा असा युक्तिवाद ऐकला असेल की, ते धूम्रपान करतात, परंतु त्यासोबत योग्य पोषण आणि व्यायाम (Exercise) करतात. त्यांच्या या सवयी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी पुरेशा आहेत, परंतु तसे नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चांगला आहार आणि व्यायाम कोणत्याही प्रकारे धूम्रपानामुळे आरोग्याला होणारा धोका कमी करत नाही.

त्यामुळे धुम्रपान आणि त्यामुळे होणारी हानी यावर संशोधक संशोधन करत असतात, मात्र नुकताच एका संशोधनातून धक्कादायक खुलासा झाला आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart attack) येण्याचा धोका कमी असतो.

पण थांबा याचा अर्थ असा नाही की, हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही धूम्रपान सुरू करा. अभ्यासात काय दावा करण्यात आला आहे, ते आधी नीट जाणून घ्या.

अभ्यासात काय आढळून आले आहे –

इरबिडमधील जॉर्डन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स (Jordan University of Science) अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आणि जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजीमध्ये प्रकाशित केला.

या अभ्यासाचे सह-लेखक सईद खतीब (Saeed Khatib) म्हणाले, या अभ्यासाचा उद्देश धूम्रपान करणारे, धूम्रपान न करणारे, उच्च रक्तदाब असलेले लोक आणि कमी रक्तदाब नसलेल्या लोकांमध्ये A1AT च्या प्लाझ्मा पातळीची तुलना करणे हा होता.

हा अभ्यास 29 पुरुष आणि 11 महिलांवर करण्यात आला आणि धुम्रपान करणाऱ्या आणि धूम्रपान न करणाऱ्यांच्या 4 गटांमध्ये विभागण्यात आला. त्यानंतर 1, 4, 24, 48 आणि 96 तासांच्या आत त्या लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.

Alpha-1 Anti Trypsin (A1AT) हे यकृतामध्ये आढळणारे एक प्रकारचे प्रथिन आहे आणि ते शरीराच्या ऊतींचे संरक्षण करते. संशोधनानुसार, धूम्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत अल्फा-1 अँटी-ट्रिप्सिनची पातळी धूम्रपान करणार्‍यांमध्ये ‘लक्षणीयपणे कमी’ होती.

संशोधनात असे आढळून आले आहे की, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान धूम्रपान करणाऱ्यांमध्ये A1AT चे उच्च पातळी त्यांच्या जगण्याची शक्यता सुधारते.

आणि वर नमूद केल्याप्रमाणे, धूम्रपान करणार्‍या लोकांमध्ये अल्फा-1 अँटी-ट्रिप्सिनची पातळी जास्त असते. त्यामुळे त्या लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी दिसून आला.

अभ्यासानंतर निष्कर्ष जाणून घेतल्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही धूम्रपान करण्यास सुरुवात करावी. ही गोष्ट समोर आली आहे, पण यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे, असे शास्त्रज्ञांनीही सांगितले आहे.

धूम्रपानाचे तोटे –

तज्ञ कोणालाही धूम्रपान करण्याचा सल्ला देत नाहीत. त्यांच्या मते धूम्रपानाचे अनेक तोटे आहेत. जसे:

– कर्करोग (Cancer)
– मधुमेह
– संसर्ग
– श्वासोच्छवासाची समस्या
– हृदयविकाराचा झटका
– स्ट्रोक
– रक्त परिसंचरण समस्या
– दंत समस्या
– दृष्टी कमी होणे
– प्रजनन क्षमता कमी
-ऑस्टिओपोरोसिस

म्हणूनच कोणीही धूम्रपान करू नये आणि जर कोणाला धूम्रपानाची सवय असेल तर त्याने लवकरात लवकर सोडले पाहिजे.