Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

केळी, पपई, बटाट्यापासून तयार करा ‘हे’ बायप्रॉडक्ट अन सुरू करा तुमचा स्वतःचा व्यवसाय, कमी गुंतवणुकीत मिळणार लाखोंचा नफा

0

Small Business Idea : अलीकडे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य नागरिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य देखील पुरवले जात आहे.

शासन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील देत आहे. देशातील अनेक नामांकित बँका व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकांना कर्ज पुरवत आहेत. हेच कारण आहे की गेल्या काही वर्षांमध्ये देशात नवनवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत.

अनेकांनी व्यवसायात नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. व्यवसायातून अनेक लोकांनी चांगली प्रगती साधली आहे आणि आपले आयुष्य सुखकर बनवले आहे. यामुळे आता नवयुवक तरुणांचा व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे.

मात्र नवयुवक तरुणांना कोणता व्यवसाय सुरू करावा हा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत नवयुवक तरुणांसाठी आम्ही एक भन्नाट बिजनेस आयडिया घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण अशा एका बिजनेस बाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगली कमाई करता येणार आहे. आम्ही वेफर्सच्या व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत.

कसा सुरू करायचा वेफर्स व्यवसाय

बाजारात उपवासाच्या वेफर्सची तसेच इतरही अन्य वेफर्सची मोठी मागणी आहे. उपवासासाठी तसेच स्नॅक म्हणून मोठ्या प्रमाणात वेफर्सचे सेवन केले जात आहे. यामुळे या बिझनेसला बाजारात मोठा स्कोप आला आहे. बाजारात केळी, पपई, बटाटे, रताळे, बीट रूट यांसारख्या विविध वेफर्सला मोठी मागणी असते.

यामुळे तुम्हीही या संधीचे सोने करू शकता आणि वेफर्स व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकणार आहात. या व्यवसायासाठी तुम्हाला कच्चे मटेरियल म्हणून केळी, पपई, बटाटे, रताळे, बीट रूट लागणार आहे.

हा माल शेतकऱ्यांकडून खरेदी करावा लागणार आहे. तुम्ही थेट घाऊक बाजारातून देखील हा माल खरेदी करू शकता. पण जर तुम्ही शेतकऱ्यांकडून हा माल खरेदी केला तर तुम्हाला अधिकचा नफा या ठिकाणी मिळणार आहे.

याशिवाय तुम्हाला काही मसाले मीठ तसेच यांसारख्या इतर किरकोळ वस्तू लागणार आहेत. तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून देखील सुरू करू शकता किंवा भाड्याने एक गाळा घेऊन हा व्यवसाय तुम्ही ओपन करू शकता.

या व्यवसायासाठी तुम्हाला काही मशीन्स सुद्धा लागणार आहेत. केळी, बटाटे इत्यादी सोलण्यासाठी तसेच त्याचे पातळ काप तयार करण्यासाठी मशीन लागणार आहे. वेफर तळण्यासाठी मशीन लागणार आहे.

याशिवाय तयार झालेले वेफर्स पॅक करण्यासाठी मशीन लागणार आहे. पॅकिंग मटेरियल म्हणून तुम्हाला बंद पॅकेट वापरावी लागणार आहेत. तसेच पॅक झालेले मालाचे वितरण करण्यासाठी तुम्हाला एका गाडीची देखील आवश्यकता भासू शकते.

एकंदरीत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आठ ते दहा लाखांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. सुरुवातीला तुम्ही छोट्या स्तरावर देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

मात्र हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. फूड संबंधित व्यवसाय असल्याने तुम्हाला एफएसएसएआय कडे देखील तुमच्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. शॉप ॲक्ट लायसन तुम्हाला काढावे लागणार आहे.

व्यवसायातून किती कमाई होणार 

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 100 किलो वेफर्स तयार करण्यासाठी जवळपास 7000 चा खर्च करावा लागू शकतो. तसेच हे शंभर किलोचे वेफर्स बाजारात 15000 पर्यंत विकले जाऊ शकतात.

म्हणजेच खर्च वजा करता तुम्हाला 100 किलो वेफर्स विक्रीतून 8000 पर्यंतचा नफा या ठिकाणी मिळणार नाही. वेफर्स विक्रीतून प्रति किलो 70 ते 100 रुपयांपर्यंतचा नफा या ठिकाणी मिळू शकतो.

जर समजा एका दिवसात 40 ते 70 किलो पर्यंतचे वेफर्स तुम्ही तयार केलेत तर तुम्हाला या व्यवसायातून दिवसाला तीन हजार रुपयांपासून ते 6000 रुपयांपर्यंत ची कमाई होणार आहे. म्हणजेच वेफर्स विक्रीतून तुम्ही महिन्याकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न या ठिकाणी कमवू शकणार आहात. तथापि कमाईचा हा सर्व आकडा तुमच्या सेलिंगवर अवलंबून राहणार आहे. जेवढा तुमचा सेल असेल तेवढा नफा तुम्हाला या व्यवसायातून मिळणार आहे.