मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या पोस्ट चाहत्यांनाही खूप आवडतात. दरम्यान श्रेया बुगडेने नुकतीच एक पोस्ट केली आहे. यात तिने आम्रखंड की…. श्रीखंड?…असा प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न जेवढा मजेशीर वाटत आहे तेवढ्यात मजेशीर कमेंट या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.

श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्रेया पिवळ्या रंगाच्या साडी दिसत आहेत. तसेच, या सुंदर फोटोसोबत तिनं पोस्टला भन्नाट कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, आम्रखंड की….. श्रीखंड ?????…आज दुपारी बेत काय होता ते विचारतेय ??? तिच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कमेंटचा वर्षावच केला आहे.

पोस्टवर एकानं कमेंट करत म्हटलं की, ‘आमच्याकडं कचा बदाम’ तर दुसऱ्याने लिहिलं की, ‘बुंदेलखंड’. आणखी एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, ‘नर्सोबाच्या वाडीची बासुंदी…’, तर काहींनी ‘गुलाबजाम’ तर काहींनी ‘रबडी’ म्हणत कमेंट केल्या आहेत. सध्या या कमेंटची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे मिळाली. तसेच, श्रेया सध्या ‘किचन कलाकार’ या शोला होस्ट करत आहे.