मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत ब्रेकअप केल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे श्रद्धा चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र, या सतत येणाऱ्या बातम्यांनी श्रद्धाची डोकेदुखी वाढवली आहे. यावर तिने नुकतीच प्रतिक्रिया देत या बातम्यांना स्थगिती दिली आहे.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत तिने स्वतःचा एक सुंदर हसरा फोटो शेअर केला आहे. यासोबत या पोस्टला तिने दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘और सुनाओ…’ अश्या दोन शब्दातच श्रद्धाने या बातम्यांवर आपली चोख प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, नुकतंच श्रद्धा कपूरने गोव्यात तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी रोहनने हजेरी लावली नव्हती. त्यानंतरच या चर्चांना उधाण आले होते. यंदाच्या जानेवारी महिन्यापासूनच त्या दोघांच्या नात्यात खटके उडण्यास सुरुवात झाली होती. यानंतर त्या दोघांमध्ये दुरावा वाढला. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला? त्यामागचे नेमकं कारण काय? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.