मुंबई : आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही नऊवारी साडी नेसून गुढीपाडव्याचा खास सोहळा साजरा केला. या सेलिब्रेशनचा सुंदर फोटो श्रद्धाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पारंपरिक महाराष्ट्रीयन लूकसह या सुंदर फोटोमध्ये श्रद्धा खूपच क्यूट दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सुंदर फोटोंद्वारे नेहमीच चाहत्यांचे मन जिंकते. यावेळीही श्रद्धाचा हा लूक पाहून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर पारंपारिक नऊवारी साडीतील एक फोटो शेअर करत श्रद्धाने कॅप्शन लिहिले, “नव संकल्प करूया नवीन वर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”
यासह श्रद्धाने दिवसाची सुरुवात घरच्या घरी बनवलेल्या महाराष्ट्रीयन पदार्थाने केली. तसेच सेटवर उपस्थित असलेल्या टीमसाठी देखील श्रद्धा महाराष्ट्रीयन पदार्थ घेऊन गेली होती.