मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्या फिटनेस आणि स्टाइलचे लोक वेडे आहेत. जॉन नुकताच अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या फिटनेस शोमध्ये पोहोचला होता. माञ, यावेळी जॉनने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या खुलस्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

या शोमध्ये जॉनने शिल्पासोबत खरे-खोटे सांगायचा सेशन खेळला. या मजेदार सेशनदरम्यान शिल्पा शेट्टीने सांगितले की जॉन अब्राहमने 25 वर्षांपासून त्याची आवडती गोड काजू कतली खाल्ली नाही. यावर जॉन हसला आणि म्हणाला, ‘मला वाटतं तू चुकीचं बोलत आहेस. काजू कतली खाऊन 27 वर्षे झाली. बराच वेळ गेला. मी सॉफ्ट ड्रिंक्स पीत नाही. मी सहमत आहे की साखर हे जगातील सर्वात मोठे विष आहे. सिगारेट ओढण्यापेक्षा मोठे.” असं जॉन म्हणाला.

पुढे जॉन म्हणतो की, “जीवनासाठी मनःशांती देखील खूप महत्वाची आहे. माझ्या फोनमध्ये सोशल मीडिया अॅप नाही. मी व्हॉट्सअॅपही वापरत नाही. एवढेच नाही तर तो लवकरच सोशल मीडियापासून दुर होणार असल्याचेही जॉन म्हणाला. या मुलाखतीत जॉनने त्याच्या आयुष्यातील अश्या अनेक गोष्टी शेअर करत चाहत्यांनाही त्याबद्दल सल्ला दिला आहे.

 

दरम्यान, जॉन अब्राहमच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत ‘पठाण’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तो ‘अटॅक’, ‘सरफरोश 2’, 1911 अश्या अनेक चित्रपटात दिसणार आहे.