मुंबई : अभिनेता रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाचा साउंडट्रॅक रॅपर धर्मेश परमार याचं निधन झालाच्या धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार धर्मेशने कार अपघातात आपला प्राण गमावला आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनेकजण यावर शोक व्यक्त करत आहेत.

धर्मेशला एमसी तोडफोड म्हणून ओळखला जायचा. तो स्ट्रीट रॅपर्स ग्रुपमध्ये होता. तसेच, तो गुजराती रॅपसाठीही खूप प्रसिद्ध होता. एवढंच नाहीतर स्वदेशी नावाचा त्याचा एक सिंगिंग बँडचा होता. या बँडनेच धर्मेशच्या निधनाची बातमी दिली आहे.

स्वदेशी बँडने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत धर्मेशच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याच्या खास शैलीत त्यांनी धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘स्वदेशी बॅन्डने त्याच्या परफॉर्मन्सचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. आणि त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.