मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसोबत मालदीवच्या सुट्टीवर गेल्या होत्या. या सुट्टीदरम्यान, करिश्मा कपूरने करिनाचा असा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये करीना कपूरचा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहे.

मालदीवमध्ये दोन्ही कपूर बहिणींनी खूप मस्ती केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये करिश्मा कपूरसोबतच्या करीना समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये करिनाचा चेहरा इतका लाल दिसत आहे. चेहरा सूर्यप्रकाशामुळे इतका खराब झाला आहे की करिना एका दृष्टीक्षेपात ओळखणे कठीण झाले आहे.

या फोटोमध्ये करीना निळ्या रंगाचा वन पीस परिधान करताना दिसत आहे, तर करिश्माने पांढरा आणि लाल रंगाचा कॉम्बिनेशन ड्रेस घातला आहे. मालदीवचा हा फोटो करिश्मा कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करिश्मा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, “एकमेकांसाठी कृतज्ञ आणि मधल्या प्रत्येक गोष्टीसाठी.” यासोबतच अभिनेत्रीने हार्ट इमोजीही बनवले आहे. दरम्यान, या पोस्टवर अनेक युजर्स कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.