मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘हुनरबाज’ हा रियालिटी शो सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये स्पर्धकांचे वेगवेगळे टॅलेंट पाहून शोचे जजच नाहितर प्रेक्षकही अचंमबीत होत आहेत. दरम्यान, या शोमध्ये प्रसिद्ध कॅमेडिअन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया शोचे सूत्रसंचालन करत आहेत आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा, करण जोहर, मिथून चक्रवर्ती हे या शोचे जज आहेत. दरम्यान, नुकताच सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या या शोमधून एक वाद समोर आला आहे. हा वाद भारती आणि शोचे होस्ट करण जोहर यांच्यात झाला आहे. भारती प्रेग्नंट असतानाही करणने भारतीबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे.

हुनरबाजच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करण जोहरसोबत परिणीती चोप्राही दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही भारतीच्या मुलाबद्दल बोलताना दिसत आहेत. करण जोहर म्हणाला, ‘मला फक्त भीती वाटते, हे होणार आहे’, या ओळीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पुढे, करण जोहर आणि परिणीती चोप्रा भारतीच्या मुलाचे नाव ठेवताना दिसत आहेत. मुलगा असेल तर ‘हुनर’ आणि मुलगी असेल तर ‘बाज’, असे दोघेही बोलतात. यानंतरही दोघेही भारतीच्या मुलाची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

 

पुढे व्हिडिओमध्ये करण जोहरच्या बोलण्यावर भारती सिंग म्हणताना दिसते की, “त्यांनी आपल्या मुलांची नावे यश आणि रुही ठेवली आहेत आणि आमच्या मुलाचे असे नाव ठेवले आहे.” यानंतर करण जोहर पुन्हा म्हणतो की, “आणखी एका बाळाचे नाव सुचवले आहे. तो प्रवीर आहे. जर तू तुझ्या मुलचे नाव प्रवीर ठेवलस आणि मला श्रेय दिले नाहीस तर मी तुला कोर्टात खेचेन.” अस करण या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.