नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतो. यावेळी शोएब अख्तरने असेच काहीसे वक्त्यव्य केले आहे. शोएब अख्तर आणि टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांच्यात नेहमीच मैदानात 36 चा दिसला आहे. मैदानाबाहेरही हे दोन्ही खेळाडू अनेकदा वाद घालताना दिसले आहेत.
दरम्यान, शोएब अख्तरने सुप्रसिद्ध YouTubers तन्मय भट्ट, याच्या चॅट शोमध्ये वीरेंद्र सेहवागवर प्रतिक्रिया दिली आहे. याठिकाणी शोएब अख्तरचे एक जुने ट्विट स्क्रीनवर दाखवण्यात आले होते. या ट्विटमध्ये शोएब अख्तरने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो कोट आणि चष्मा घातलेला दिसत आहे. त्यावेळी शोएब अख्तरच्या या फोटोवर कमेंट करताना वीरेंद्र सेहवागने लिहिले, “ऑर्डर लिहा 1 बटर चिकन, 2 नान आणि 1 बिअर.”
वीरेंद्र सेहवागच्या याच मजेशीर कमेंटबद्दल शोएब अख्तरला विचारण्यात आले तेव्हा शोएब अख्तरने अगदी विनोदी पद्धतीने उत्तर दिले आणि म्हणाला, “दिल कर रहा है किसी दिन पकड़कर सहवाग को मारूं” यावेळी शोएब अख्तर अनेक विषयांवर बोलला. शोदरम्यान शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरशी संबंधित एक मजेदार किस्साही शेअर केला.