नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात शोएब अख्तरची एक धोकादायक गोलंदाज म्हणून ओळख होती. आणि आता तो सोशल मीडियावर आपल्या वक्त्यव्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. शोएब अख्तर आपले स्पष्ट मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि तो भारतीय क्रिकेटपटूंसोबतचे स्वतःशी संबंधित अनेक मजेदार गोष्टी शेअर करत असतो. शोएब अख्तर हा अतिशय आक्रमक गोलंदाज होता. त्याने आपल्या आक्रमक गोलंदाजीने विरोधी फलंदाजांच्या दांड्या
उडवल्या आहेत.
शोएब अख्तरने आपल्या गोलंदाजीने जगातील अनेक दिग्गज फलंदाजांच्या दांड्या उडवल्या आहेत, पण टीम इंडियात असे दोन फलंदाज होते ज्यांच्यासमोर अख्तर फ्लॉप ठरला आहे. हे फलंदाज दुसरे कोणी नसून सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आहेत. याच फलंदाजांचे कौतुक करत त्याने यावेळी म्हटले की या दोन फलंदाजांनी नेहमीच माझ्या गोलंदाजीचा सामना केला पण माझ्या हाती नेहमीच निराशा आली.
यावेळी शोएब अख्तरने निवृत्तीचे कारणही सांगितले आहे. यावेळी तो म्हणाला की, “माझ्या निवृत्तीचे मुख्य कारण म्हणजे मी आता सकाळी लवकर उठत नाही. गेली 25 वर्षे मी सकाळी सहा वाजता उठून सचिन आणि द्रविड यांच्यासोबत सराव करायचो आणि हे दोन फलंदाज मला दिवसभर थकवायचे. निवृत्तीचे प्रमुख कारण हेच आहे की मी आता सकाळी लवकर उठू शकत नाही.
याचवेळी शोएब अख्तरने भारताच्या पाकिस्तान दौऱ्याच्या काही खास आठवणी देखील सांगितल्या.