MS DHONI
Shivam Dubey to replace Suresh Raina? That could be CSK's playing XI

मुंबई : IPL 2022 चा पहिला सामना 26 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकून धोनीच्या संघाला स्पर्धेत शानदार सुरुवात करायची आहे. CSK चा संघ यावर्षी खूप मजबूत दिसत आहे आणि या महत्वाच्या सामन्यात ते त्यांच्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतात. आयपीएलमध्ये केकेआर आणि सीएसके यांच्यात 19 वेळा सामना झाला असून त्यात चेन्नईने 12 सामने जिंकले आहेत आणि केकेआरला केवळ सात सामने जिंकता आले आहेत.

धोनी या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैनाचा पर्याय म्हणून शिवम दुबेचा संघात समावेश करू शकतो. शिवम दुबे हा डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे तो सुरेश रैनाला चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचवेळी मोईन अली आणि रॉबिन उथप्पा हे देखील या जागेसाठी पर्याय असू शकतात.

फ्रँचायझीने मागील हंगामातील आपल्या बहुतेक खेळाडूंना संघात परत आणले आहे. गत हंगामातील ऑरेंज कॅप विजेत्या ऋरुतुराज गायकवाडसह सुरू होणारी फलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी ताकद असेल.

ऋतुराज गायकवाड यांच्यानंतर मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा असे काही अनुभवी खेळाडू संघासाठी उपयुक्त ठरू शकतात. चार वेळा चॅम्पियन असलेल्या सीएसकेने शिवम दुबे, डेव्हॉन कॉनवे आणि ख्रिस जॉर्डन यांच्या जोडीने संघ आणखी मजबूत केला आहे.

केकेआरविरुद्धच्या सामन्यात धोनीचा संघ ‘या’ प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरू शकतो.

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर.