SHIKHAR DHAWAN
Shikhar Dhawan dances with Punjab Kings players; Video goes viral

मुंबई : पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव करून IPL 2022 मध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. आता त्यांच्या दुसऱ्या लीग सामन्यापूर्वी, स्टार सलामीवीर शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या सहकाऱ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे.

या डान्समध्ये कागिसो रबाडा, ओडिन स्मिथ, अर्शदीप सिंग आणि हरप्रीत बरार यांनी धवनला साथ दिली. पंजाब किंग्जच्या खेळाडूंनी आपल्या डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली. धवनने शेअर केलेल्या या व्हिडिओला एक लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. धवनने पोस्टला कॅप्शन दिले, “पंजाबी तडका आणि कॅरेबियन मजा.”

मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने रविवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आरसीबीसमोरील २०५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. ओडीन स्मिथने केवळ 8 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. शाहरुख खानने स्मिथसोबत चांगले योगदान देत २४ धावा केल्या. आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत पंजाब किंग्जचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचा पुढील सामना शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

आयपीएल 2022 च्या लीग टप्प्यासाठी पंजाब किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्ससह ग्रुप बी मध्ये ठेवण्यात आले आहे.