मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीचे लोकप्रिय कपल तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची जोडी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत पाहायला मिळते. दोघांच्या चाहत्यांकडून या जोडीला भरभरून प्रेम दिले जाते. या दोघांनी लवकर लग्न करावे अशी इच्छाही त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जाते. यातच आता तेजस्वी आणि करणने लग्न तर केले नाही मात्र, त्यांचा फ्युचर प्लॅन आतापासून सुरू झाला आहे. याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करणने वक्तव्य केले आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत करण कुंद्राने त्याच्या आणि तेजस्वी प्रकाशशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. करण कुंद्राने यावेळी सांगितले की, तेजस्वी प्रकाशला जवळपास 25 मुलांची गरज आहे. “मला एक मुलगी हवी आहे, पण तिला 25 मुले हवी आहेत. आम्ही पुढचा प्लॅन पण केला आहे. मी माझ्या बहिणीच्या मुलींसोबत खूप काळ वेळ घालवला आहे. त्यामुळे माझं नात मुलींसोबत चांगलं जमत. मला मुलगी झाली आणि दोन-तीन मुलं झाले नाहीत तर माझे नाव बदला. मी माझ्या पूर्ण प्रयत्नाने चांगला पिता होईल आणि मला मला स्वत:वर विश्वास आहे की एक चांगलाच पिता बनणार आहे.” असं करण यावेळी म्हणला.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट ‘बिग बॉस 15’च्या घरात झाली होती. तिथे दोघेही आधी एकमेकांचे मित्र बनले होते, त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि शो संपून झाला असला तरी हे कपल एकत्र आहेत. दोघे सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना स्पॉट होतात. दोघांची ही जोडी त्यांच्या चाहत्यांना ही खुप आवडते.