मुंबई : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांच्यासाठी यावेळची होळी खूप खास होती. या जोडप्याच्या लग्नानंतरची ही पहिली होळी होती त्यामुळे अंकिता आणि विकी दोघांनीही होळीच्या पार्टीत एकत्र खूप मजा केली. या जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अंकिता आणि विकी एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत.
अशातच या दोघांचा आणखी एक व्हिडिओ व्हयरल होत आहे ज्यात अंकिता पती विकी जैनवर रागवलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि विकी पहिल्यांदा रोमँटिक शैलीत एकमेकांच्या गळ्यात हात घालून नाचताना दिसत आहेत. मग कॅमेरा इतरांकडे वळतो, तेव्हा अचानक दोघांमध्ये भांडण चालू असल्याचे दिसते.
व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, “हसत खेळत अंकिता अचानक चिडते, तेव्हा पती विकी जैन अंकिताला शांत करण्याचा प्रयत्न करतो. अंकिताला शांत करण्याची पद्धत चाहत्यांच्या खूप पसंतीस पडली आहे. पती विकी अंकिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, तर अंकिता त्याच्या डोळ्यात बघून काहीतरी बोलते.
अंकिता आणि विकी दोघेही सध्या स्टार प्लस शो ‘स्मार्ट जोडी’ मध्ये दिसत आहेत. शोमध्ये दोघेही अनेकदा रोमँटिक झालेले दिसले आहेत. या शोमुळे दोघांची लोकप्रियता वाढत आहे.