मुंबई : तेलगू इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ ​​डॉली डी क्रूझबद्दल नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्ते अपघातात या गायत्रीने जीव गमावल्याची माहिती मिळाली आहे. वयाच्या 26व्या वर्षी गायत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. तिच्या जाण्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रिपोर्ट्सनुसार शुक्रवारी 18 तारखेला उशीरा होळी सेलिब्रेशननंतर गायत्री घरी परतत होती, तिच्यासह तिचा मित्र राठोड देखील होता. कार चालवत असताना डिव्हायडरवर गाडी आपटल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाल्याचे समजते आहे. यावेळी गायत्रीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र राठोड जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याठिकाणीच त्याने अंतिम श्वास घेतला. या दोघांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

तसेच, मीडिया अहवालानुसार रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेला कारची धडक बसली होती. मात्र, कार उलटल्याने महिला त्याखाली दबली गेली आणि तिचाही जागीच मृत्यू झाला. या बातम्यांनी कलाविश्वात गोंधळ उडवला आहे. सगळीकडून दुःख चाहते, सेलिब्रिटी दुःख व्यक्त करत आहेत.