मुंबई : एस. एस. राजमौली यांचा RRR हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाने एका दिवसातच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने प्रेक्षकांना तर एवढं वेडं लावलं आहे की, सिनेमागृहात चित्रपटाच स्क्रीनिंग करताना थोडा बिघाड झाल्यामुळे चाहत्यांनी चक्क त्या सिनेगृहात थोडफोडच केली आहे.

वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये जेव्हा तांत्रिक बिघाडामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे लागले. यामुळं चाहत्यांचा राग अनावर झाला आणि लोकांनी तिथं तोडफोड सुरू केली. विजयवाडा येथील अन्नपूर्णा थिएटरमध्ये हा अपघात झाला आहे. यावरून लोकांमध्ये ‘आरआरआर’बद्दलचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असल्याची माहिती मिळाली आहे.

RRR चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्याच दिवशी चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतातील प्रत्येक भाषेत 156 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर वर्ल्डवाइड मूव्हीने 223 कोटींचा आकडा गाठला आहे. तर उत्तर भारतात या चित्रपटाने 25 कोटींचा आकडा पार केला आहे. भारतातच नव्हे तर जगभरात RRR ची तोडफोड कमाई पाहायला मिळत आहे.

दरम्यान, RRR चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ दाखवला गेला आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकत आहेत.