babar azam
"Sending the father is not enough for you"; Babar Azam ridiculed by Indian fans

नवी दिल्ली : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 115 धावांनी पराभव करून तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-0अशी जिंकली. या विजयानंतर एकीकडे ऑस्ट्रेलियाचे चौफेर कौतुक होत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानी संघाच्या पराभवामुळे चाहते संतापले आहेत.

ऑस्ट्रेलियन संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. आणि पॅट कमिन्सचा संघ ज्या प्रकारे या तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळला त्यामुळे जुन्या ऑस्ट्रेलियन संघाच्या आठवणी ताज्या झाल्या. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार उस्मान ख्वाजा होता, ज्याने संपूर्ण मालिकेत पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पाकिस्तानच्या पराभवानंतर चाहते मीम्सचा पाऊस पाडत आहेत आणि कमेंट करून आपला राग व्यक्त करत आहेत. त्याच वेळी, भारतीय चाहतेही संधीचा उचलत असल्याचे दिसून येत आहे. एका भारतीय चाहत्याने आपल्या ट्विटमध्ये पाकिस्तानी संघाला ट्रोल करत लिहिले की, ‘भेज अपने बाप को तेरे बस की बात नहीं है’. या चाहत्याने आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत करणाऱ्या टीम इंडियाकडे बोट दाखवले आहे. त्याचवेळी, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “ऑस्ट्रेलियाला कसे हरवायचे हे बापाकडून शिका.”

या संपूर्ण कसोटी मालिकेत बाबर आझमचा संघ बचावात्मक भूमिका घेताना दिसला आणि प्रत्येक वेळी कसोटी सामना वाचवताना दिसला. यामुळेच लाहोरमधील पराभवानंतर बाबर आझमच्या संघाला ट्रोल करण्याची एकही संधी चाहते सोडत नाहीत.