Yashoda :(Yashoda) सामंथा रुथ प्रभूच्या (Samntha Ruth Prabhu) यशोदा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, हा चित्रपट बघून नक्कीच अंगावर काटा येईल. या चित्रपटामध्ये ती एका गरोदर महिलेच्या भूमिकेत दिसणार असून, प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

रुथ प्रभूच्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या त्याचा धमाकेदार टीझर (Teaser) प्रदर्शित झाला असून तो पाहिल्यानंतर या चित्रपटाविषयी लोकांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. चित्रपटाची कथा एका गर्भवती महिलेवर केंद्रित आहे, जिची भूमिका समांथाने केली आहे.

टीझरची सुरुवात समांथापासून होते, जिला डॉक्टर सांगतात की ती गरोदर आहे आणि तिला काय काळजी घ्यावी लागेल. या दृश्यादरम्यान आणखी बरेच शॉट्स देखील दिसत आहेत, ते पाहून असे दिसते की कोणीतरी सामंथाचा पाठलाग करत आहे. शॉट्स खूप भीतीदायक आणि सस्पेन्सने भरलेले आहेत. गरोदर महिलेच्या आयुष्यात होणारा गोंधळ पाहून कोणाच्याही अंगावर काटे येऊ शकतात.

सामंथाचा चित्रपट मुख्यत्वे तेलुगूमध्ये बनला आहे, परंतु तो हिंदीसह इतर भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. याला सामंथाचा पहिला बॉलीवूड डेब्यू चित्रपट म्हणता येणार नाही, पण हिंदीत डब केलेला हा तिचा पहिला चित्रपट म्हणता येईल.

समंथा आता केवळ दक्षिणेचीच नाही तर देशभरातील आवडती अभिनेत्री बनली आहे. त्यांचा हा चित्रपट हिंदी पट्ट्यातील सिनेप्रेमींसाठी भेटवस्तू ठरेल आणि टीझर पाहून देशभरातील प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचण्यात यश मिळेल असे वाटते.

हरी आणि हरीश यांनी एकत्रितपणे समंथा रुथ प्रभूच्या यशोदाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये वरलक्ष्मी सरथकुमार आणि उन्नी मुकुंदन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

यात सामंथाचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी हा चित्रपट यावर्षीच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तेव्हा यशोदासोबत सस्पेन्स-थ्रिलरने भरलेल्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा.