मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये अजूनही पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील डायलॉग, गाणे यांनी तर स्वतः ची एक वेगळीच छाप सोडली आहे. यातच अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूच्या ‘ओ अंतवा’ या गाण्याने तर लोकांना वेडच लावलं आहे. मात्र, आता सामंथा ‘पुष्पा 2’मध्ये झळकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, सामंथाच्या ऐवजी ‘पुष्पा 2’मध्ये सलमान खानची अभिनेत्री दिशा पटनीला घेतले जाऊ शकते. जिने अनेक गाण्यांमध्ये आपला जलवा दाखवला आहे. या यादीत दिशा पटानीचे नाव आघाडीवर आहे. यावर अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, या बातमीने दिशाचे चाहते खूप आनंदित झाले आहेत.

दरम्यान, ‘पुष्पा 2’चे ‘पुष्पा : द रुल’ असे नाव ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे, पण आता उत्तर भारतीय अँगल आल्याने या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्याचा विचार निर्माते करत आहेत जेणेकरुन चित्रपटात आणखी परिणाम होईल. त्याचवेळी, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेत काही बदल करण्यात आले आहेत आणि पुष्पाच्या काही वेगळ्या छटा शोधल्या जात आहेत. अशी माहिती काही दिवसांपूर्वी माध्यमातून मिळाली आहे.