मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा अभिनेता नागा चैतन्यसोबत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला होता. पतीपासून घटस्फोटझाल्यानंतर समांथाने नागासोबतचे तिचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीटही केल होतेे. मात्र, आता घटस्फोटाच्या इतक्या महिन्यांनंतर समंथाने नागासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

सामंथाने ‘माजिली’ या चित्रपटाला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तिचा आणि नागा चैतन्यचा एक फोटो शेअर केला आहे. हा चित्रपट 5 एप्रिल 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. समंथा आणि नागा यांचा हा सोबतचा चौथा आणि लग्नानंतरचा पहिला चित्रपट होता. या फोटोवरून चाहते दोघांमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा अंदाज बांधत आहेत.

दरम्यान, सामंथा आणि चैतन्यने २०१७ मध्ये थाटामाटात लग्न केले होते. लग्नाच्या ४ वर्षांनंतर दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून घटस्फोटाची बातमी दिली होती. दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आता सामंथा आणि चैतन्य या दोघांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.