मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री सुपरस्टार सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य हे काही महिन्यांपूर्वी वेगळे झाले आहेत. सामंथा आणि नागा यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दोघे वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर बरेच महिने चाहते प्रार्थना करत होते की त्यांनी पुन्हा एकत्र आलं पाहिजे. पण आता सामंथाने असे काही केले आहे की आता या दोघांना परत येण्यास वाव नाही हे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपुर्वी समांथाने नागा चैतन्यला तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. इतकेच नाही तर नागाला अनफॉलो करण्यासोबतच समांथाने तिचे फोटो आणि घटस्फोटाशी संबंधित पोस्टही तिच्या अकाउंटवरून डिलीट केली आहे, ज्यामुळे समंथा आता नागाच्या आयुष्यात पत्नी म्हणून परत येणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

तसेच, समंथाने नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या लग्नाचा पोशाखही परत केल्याचे समजते आहे. लग्नात समांथाने तिच्या आजी सासूबाईंची साडी नेसली होती आणि तिला या रुपात पाहून सगळेच दंग झाले होते. मात्र, आता घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतर त्यांनी लग्नाचा पोशाख परत केला आहे.

दरम्यान, समंथा सध्या ‘यशोदा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तयार करण्यात आलेला सेट हा पंचतारांकित हॉटेलसारखा असल्याचे माध्यमांमध्ये बोलले जात आहे. तो सेट इतका सुंदर आहे की सेटला पाहून समंथा दंग झाली आहे. या कारणास्तव तिने घरी न राहता शूटिंग सेटवरच थांबण्याचा निर्णय घेतला.