salman kahn
Salman Khan's troubles escalate again; Summons issued by the court in this case

मुंबई : सलमान खान काळवीट शिकार प्रकरण तर संपूर्ण जगाला माहीत आहे. गेली कित्येक वर्ष झाली या प्रकरणावर सुनावणी होत होती. दरम्यान, या प्रकरणात आता राजस्थान उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. यात न्यायालयाने सलमान खानला मोठा दिलासा दिला असून, सलमान खानशी संबंधित सर्व याचिकांवर हायकोर्टात सुनावणी होणार असल्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने दिले आहेत. मात्र, आता या अभिनेत्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा फटका बसला आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने अभिनेता सलमान खानला 5 एप्रिलला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने अभिनेत्याला आयपीसी कलम 504 आणि 506 अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यासाठी समन्स बजावले आहे. पत्रकार अशोक पांडे यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नोटीस बजावली आहे. आयपीसीच्या कलम 504 आणि 506 अंतर्गत दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाने सलमान खानला पुढील महिन्यात 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर दाखल झालेल्या खटल्यात समन्स जारी केले असून त्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण 2019 मधील पत्रकार अशोक पांडेशी संबंधित आहे, जेव्हा त्यांनी अभिनेत्यावर गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.