मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. यात आता अभिनेता सलमान खान यानेही आपली प्रतिक्रिया देत चित्रपटाचे कौतुक केले आहे.याबद्दलचा खुलासा नुकताच अनुपम खेर यांनी केला आहे.

याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी खुलासा केला आहे की, “सलमान खानने चित्रपट पाहिल्यानंतर मला फोन केला आणि चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनंदनही केले.” असं खेर म्हणाले. सलमान खान आणि अनुपमान खेर यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोन कलाकारांमध्ये मजबूत बॉन्डिंगही पाहायला मिळते. त्यामुळे सलमान खानने अनुपम खेर यांना असे फोन करून त्यांचे अभिनंदन करणे यात नवल नाही.

दरम्यान, अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे, या चित्रपटाच्या सध्याच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘द काश्मीर फाइल्स’ने बॉक्स ऑफिसवर 217 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचबरोबर कमाईचा आकडा थांबलेला नसून तो वाढतच आहे.