मुंबई : साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर NTR यांचा RRR चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसने पहिल्याच दिवशी सर्वांना हादरवून सोडले. मात्र, आता या चित्रपटाच्या 5व्या दिवशी तर कमाईच्या आकड्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 257.15 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. दुसऱ्या दिवशी हा चित्रपट केवळ 114.38 कोटींची कमाई करू शकला आणि जर आपण या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या ताज्या आकड्यांबद्दल बोललो, तर चित्रपटाच्या कमाईत बरीच घट झाली आहे.

चित्रपटाने पाचव्या दिवशी केवळ 58.46 कोटींची कमाई केली. एकूणच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 621.42 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट लवकरच अनेक विक्रम मोडीत काढू शकतो असे बोलले जात होते. मात्र चित्रपटाची सातत्याने घसरत चाललेली कमाई पाहता आता हा चित्रपट फार काही खास करू शकणार नाही असे वाटते.