मुंबई : एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमाने एकाच दिवसात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक परफॉर्मन्स दिला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 18 कोटींचा गल्ला जमवलाय. चित्रपटाने ‘द कश्मीर फाईल्स’ला पण मागे टाकले आहे. फक्त भारतातच नाहीतर चित्रपटाने अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही कोट्यावधींची कमाई केली आहे.

पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात 18 कोटींची कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय. दरम्यान या सिनेमात एनटीआर राम चरण आलिया भट, अजय देनगन हे कलाकार पहायला मिळतात.

दरम्यान, RRR चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. मात्र गोष्ट फक्त एवढीच नाही. यात अनेक ट्विस्ट आहेत, ड्रामा आहे, भरभरून अॅक्शन आहे, डान्स आहे, थोडीफार कॉमेडीही आहे. राजामौलींचा हा चित्रपट म्हणजे ‘फुल पॅकेज’ आहे.