rohit sharma
Rohit Sharma sets world record; Became the No. 1 captain in just 16 matches

नवी दिल्ली : भारत श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (24 फेब्रुवारी) लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळवला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने 62 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या शानदार विजयासोबतच काही खास विक्रमही केले आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने कर्णधार मोईन मॉर्गन आणि किवी कर्णधार केन विल्यमसनची बरोबरी केली आहे. खरे तर या दोन्ही खेळाडूंच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर 15 टी-20 सामने जिंकले. आता या यादीत रोहित शर्माने त्यांची बरोबरी केली आहे. मात्र, रोहितने केवळ 16 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. श्रीलंका मालिकेत रोहितला या यादीत अव्वल स्थान मिळवण्याची चांगली संधी असेल.

भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्माने स्वतःचा एक जुना विक्रमही मोडला आहे. हिटमॅनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 साली सलग 12 सामने जिंकले होते, मात्र आता 2019-22 या वर्षात रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने एकापाठोपाठ एक 13 विजय मिळवले आहेत.

या यादीत रोहित शर्मानंतर, माजी कर्णधार विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2017 मध्ये सलग 12 सामने जिंकले होते, तर धोनीने 2013 मध्ये अशाच प्रकारे 9 सामने जिंकले होते.

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांच्या यादीत, ज्यांनी सलग सर्वाधिक टी-20 विजय मिळवले आहेत, त्यात भारतीय संघ आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाने गेल्या दहा टी-20 सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला आहे आणि हा ट्रेंड अजूनही सुरू आहे.

2018-19 या वर्षात अफगाणिस्तान संघाने सलग 12 टी-20 सामने जिंकले होते, त्यामुळे अफगाणिस्तान संघ या विक्रमाच्या शीर्षस्थानी आहे, परंतु भारतीय संघाला तो मोडण्याची चांगली संधी आहे.