rohit sharma
Rohit Sharma ready for sixth title, starts preparations for IPL 2022

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल 2022 साठीची तयारी सुरू केली आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या सरावाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. रोहितला नुकतेच टीम इंडियाचे पूर्णवेळ कर्णधारपद मिळाले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. आता या सलामीवीराच्या नजरा आयपीएलमध्ये 6वे विजेतेपद पटकावण्यावर असतील.

IPL 2022, 26 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

या आयपीएलसाठी मुंबईने रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार या चार खेळाडूंना कायम ठेवले होते. लिलावात त्यांनी 15.25 कोटी रुपये खर्च करून इशान किशनला आपल्या संघात समाविष्ट केले.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ :

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, देवाल्ड ब्रेविस, राहुल बुद्धि, ईशान किशन, आर्यन जुयाली,किरोन पोलार्ड, संजय यादव, डेनियल सैम्स, टिम डेविड, रमनदीप सिंह, रितिक शुकेन, अर्जुन तेंदुलकर, फैबियन एलन, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, टाइमल मिल्स, रिले मेरिडिथ, मोहम्मद अरशद खान, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, बासिल थंपी.