rohit virat
'Rohit Sharma is not my captain, make Virat Kohli'

नवी दिल्ली : बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात भारताने 238 धावांनी श्रीलंकेचा पराभव केला. यासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा क्लीन स्वीप केला आहे

दरम्यान, रविवारी झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन मुले एक पोस्टर घेऊन बेंगळुरू स्टेडियमवर पोहोचली. या मुलांनी स्टेडियममध्ये झळकवलेले हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर लिहिले होते की, “रोहित शर्मा माझा कर्णधार नाही, विराट कोहलीला पुन्हा कर्णधार बनवा. हा फोटो मुलांच्या वडिलांनी ट्विट केला होता, जो खूप सध्या व्हायरल होत आहे.

ट्विट व्हायरल होताच या ट्विटची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, ज्यावर अनेकांनी लिहिले की, रोहित शर्मा देशाचा कर्णधार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल असे बोलणे योग्य नाही. त्याचवेळी, काहींनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घोषणाबाजीवर आक्षेप घेतला आणि क्लब क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्यास सांगितले.

या फोटोची अनेकांनी खिल्लीही उडवली आणि लिहिले की, “रोहित तुझा कर्णधार नाही कारण तू संघात नाहीस. तर काही यूजर्सनी रोहित हा देशाचा कर्णधार आहे, कदाचित तुमच्या मुलांचा नाही असे उत्तर दिले.”

विशेष म्हणजे बंगळुरू हे विराट कोहलीचे दुसरे होम ग्राउंड आहे. कारण आयपीएलमध्ये तो सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी जोडला गेला आहे. आणि बराच काळ कर्णधार आहे. तीन दिवसांच्या सामन्यातच असे अनेक प्रसंग आले जेव्हा प्रेक्षक विराट कोहली, आरसीबीच्या घोषणाबाजी करताना दिसले.

तर बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काही प्रेक्षक सुरक्षेचा घेरा तोडून मैदानात घुसले आणि विराट कोहलीसोबत सेल्फीही काढू लागले होते. विराटने चाहत्यांसोबत फोटो काढला आणि नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना चाहत्यांवर कोणतीही कारवाई करू नका असे सांगितले.