ritesh
Riteish Deshmukh's reaction to 'The Kashmir Files' is a short film ....

मुंबई : अलीकडेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी चित्रपटाच्या समर्थनात आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी चित्रपटात अनेक गोष्टी काल्पनिक दाखवल्या असल्याचे म्हणत चित्रपटावर आक्षेप नोंदवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश ट्विटरवर करत म्हणाला, “ज्या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले त्याचे कौतुक करायलाच हवे…चित्रपट छोटा असला तरी बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांपैकी एक होण्याच्या मार्गावर आहे. असे म्हणत अभिनेत्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री तसेच चित्रपटांमधील सर्वांचे कौतुक केलं आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्येअनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेवर आधारित आहे.