rinku
बॉलिवूड गाण्यावरील रिंकूचा 'हा' व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुंदरतेने भुरळ पडणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते. सैराटमधील उत्तम अभिनयाच्या जोरावर रिकुने आपला स्वतः चा एका चाहता वर्ग निर्माण केला आहे.

अलिकडेच रिंकू राजगुरू नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात दिसली होती. कधी चित्रपटाच्या माध्यमातून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच रिंकूने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत रिंकू अतिशय साधी दिसत आहे मात्र, काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिंकूचे रूप अधिकच खुलले आहे. आपल्या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चढवणारऱ्या रिंकूने या व्हिडिओद्वारेही सोशल मीडियावरील तापमान वाढवले आहे. तिच्या व्हिडिओला चाहत्यांकडून बरीच पसंती मिळत आहे. तसेच तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षावही होत आहे. यामध्येच रिंकू एका बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.