नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी यष्टीरक्षक पीटर नेविलने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे नेविल फेब्रुवारीपासून मैदानात उतरला नव्हता आणि. शुक्रवारी सकाळी एससीजी येथे पत्रकार परिषदेत त्याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
निवृत्तीची घोषणा करताना खेळाडू म्हणाला, “मला माहित होते हा माझ्या करिअरचा शेवट आहे. माझ्यासाठी हा निराशाजनक मोसम होता, मला वाटते की या मोसमात मी माझ्या दुखापतीमुळे जास्त सामने गमावले आहेत. मला खूप अभिमान आहे की मी ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकलो आणि न्यू साउथ वेल्ससाठी मी इतके दिवस खेळू शकलो. मला वाटते की मी माझ्या कौशल्याचा पुरेपूर वापर केला.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, नेविलला त्याच्या 2015 मध्ये लॉर्ड्सवर पदार्पण करताना त्याच्या 45 धावांच्या मॅच-विनिंग खेळीसाठी सर्वात जास्त स्मरणात ठेवले जाते. पदार्पणानंतर नेविलने 16 कसोटी सामने खेळले पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्याला संघातून वगळण्यात आले. नेविलने ऑस्ट्रेलियासाठी शेवटची कसोटी 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट मैदानावर खेळली होती. या खेळाडूला एकदिवसीय सामन्यात आपल्या देशाकडून संधी मिळाली नाही. तथापि, त्याला 9 टी-20 सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि भारतात खेळल्या गेलेल्या 2016 टी 20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात त्याची निवड झाली.
नेविलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 126 सामन्यांमध्ये 36.81 च्या सरासरीने 5927 धावा केल्या. यादरम्यान त्याने 10 शतके आणि 33 अर्धशतकेही झळकावली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये असताना त्याने 77 सामन्यांमध्ये 22.73 च्या सरासरीने 1205 धावा केल्या आहेत.