नवी दिल्ली : सोनू सूदची बहीण आणि काँग्रेस उमेदवार मालविका यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. ‘आप’च्या डॉक्टर अमनदीप कौर अरोरा यांच्यात लढत पाहायला मिळत होती, मात्र 20 हजारांहून अधिक मतांनी अमनदीप यांनी सोनू सूदची बहीण मालविका यांचा निवडणूक रिंगणात पराभव करून विजयाचा झेंडा फडकावला.
बहीणच्या पराभवानंतर अभिनेता सोनू सूदने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने लोकांना वचन दिले आहे की तो आणि त्याची बहीण दोघेही आयुष्यभर लोकांच्या सेवेत व्यस्त राहतील. सोनूचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.
सोनू सूद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा ट्विटद्वारे चाहत्यांना अपडेट करत असतो. अलीकडेच त्याने त्याची बहीण मालविकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरसह अभिनेत्याने लिहिले, “विरोधात किती आहेत, हे महत्वाचे नाही. सोबत किती आहेत हे महत्वाचे आहे, मदत करण्यासाठी, फक्त जिद्द आवश्यक आहे, जो काल होतो तोच आज आहे आणि तसाच राहील. फोन नंबर आठवतो ना मित्रांनो. यासोबत त्याने “मी आणि मालविका दोघेही आयुष्यभर लोकांची सेवा करत राहू” असे कॅप्शनही दिले आहे.
Me and Malvika,
At your service for life 🙏@libransood pic.twitter.com/belGN879X1— sonu sood (@SonuSood) March 12, 2022
सोनू सूदचे हे ट्विट पाहून चाहते भरभरून कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘सर तुम्ही नेहमी आमच्या हृदयात असता’. तर दुसऱ्याने यूजरने लिहिले, काँग्रेस नाही, तुमच्या बहिणीने ‘आप’ मध्ये प्रवेश करायला हवा होता. आणखी एकाने लिहिले, “विजय आणि पराभव हे दोन पैलू आहेत, पण तुम्ही मन जिंकले आहे.”