harbhajan singh
Remarks on Nicholas Pooran cost Harbhajan dearly!

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) पाच पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रसारित होत आहे, यादरम्यान, हिंदी कॉमेंट्रीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॉमेंट्री करत असताना हरभजन सिंगने पंजाब किंग्जचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनवर केलेल्या टिप्पणीने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीच्या 18 व्या षटकात निकोलस पूरनला आवेश खानने बाद केले तेव्हा हरभजन सिंग हिंदी कॉमेंट्री दरम्यान ऑन एअर होता.

हरभजन सिंग कॉमेंट्री दरम्यान म्हणाला, “निकोलस पूरन जो खिला रहे थे चूरन अब वो अपने चूरन का खुद ही स्वाद लेते हुए बाहर जा रहा है” हरभजन सिंगच्या या कमेंटनंतर यूजर भज्जीवर चांगलेच संतापले आणि त्याला सभ्यतेचा धडा शिकवू लागले. काही नेटकरी तर भज्जीला समालोचक बनवण्यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, “हरभजन, कुणाच्या नावाची खिल्ली उडवण्यापूर्वी थोडी सभ्यता शिका. पुढे एक नेटकरी म्हणाला, कल्पना करा जर पूरन सारखा ज्युनियर येऊन तुम्हाला F OFF बोलला तर मग तुम्हाला कसे वाटेल??, तर आणखी एकाने लिहिले, भूतकाळातील केलेल्या चुकांना लक्षात घेऊन आत्तातरी चांगले वागा” भज्जीने केलेल्या या टिपणीमुळे नेटकरी चांगलेच संतापलेले दिसत आहेत.

दुसरीकडे, जर आपण आयपीएल 2022 बद्दल बोललो, तर हैदराबाद संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण, निकोल पूरनने अखेर आयपीएलमधील बॅटने आपला दुष्काळ संपवला आहे. निकोलस पूरनने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या 24 चेंडूत 34 धावा केल्या.