नवी दिल्ली : आगामी टी-20 विश्वचषक-2022 मध्ये संघाला सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वाटते. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या मागील काही काळापासून गोलंदाजी करत नाही. तर या जागतिक स्पर्धेत निव्वळ फलंदाज म्हणून त्याचा समावेश करणेही कठीण जात आहे.
आगामी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलिया आयोजित करणार आहे. यूएईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गेल्या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. त्यावेळी संघाची कमान विराट कोहली सांभाळत होता. मात्र, यावर्षी रोहित शर्मा ही जबादारी सांभाळताना दिसेल. अशा स्थितीत भारतीय संघ आयपीएल दरम्यान हार्दिकची कोणता खेळाडू घेऊ शकतो हे पाहू शकते.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “मला वाटते की सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडूची गरज नक्कीच आहे. आदर्शपणे टॉप-5 मध्ये कोणीतरी असावं जो 2-3ओव्हर्स टाकू शकेल. त्यामुळे कर्णधारावरील दबाव कमी होतो.”
माजी भारतीय प्रशिक्षक पुढे म्हणाले, “हे असे क्षेत्र असेल ज्यावर मी खूप बारकाईने लक्ष ठेवून आहे. निश्चितच वेगवान गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. मला फलंदाजीची खरोखरच चिंता नाही. फलंदाज पुरेसे आहेत. हार्दिक पांड्याला पाठीची समस्या होण्याआधी तो चांगली कामगिरी करत होता. पण नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो बराच काळ मैदानापासून दूर राहिला. संघात परतल्यावरही तो गोलंदाजी करू शकला नाही.
हार्दिकला आता नवीन IPL संघ गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या टी-20 लीगमध्ये तो प्रथमच कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. मात्र, शास्त्रीला अजूनही वाटते की हार्दिकला भारतीय टी-20 संघात एक फलंदाज म्हणून स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल कारण संघात आधीच पॉवर हिटर आहेत.
ते म्हणाला, “टॉप-5मध्ये खूप चांगले फलंदाज आहेत, ते पॉवर हिटर आहेत. जर कोणी 5, 6 नंतर स्थानावर असेल तर त्याला तो अतिरिक्त विभाग खेळात आणला पाहिजे. त्यामुळे हार्दिक आणि भारतीय संघाव्यतिरिक्त गुजरात संघाच्या दृष्टिकोनातून, त्याने त्या 2 किंवा 3 षटकांमध्ये गोलंदाजी करणे फार महत्वाचे आहे. जर त्याने तसे केले तर मर्यादित यश मिळू शकते आणि भारतीय संघात त्याची निवड होऊ शकते.