Ration Card Update : तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव शिधापत्रिकेत नसल्यास आपण ते घरी बसून सहज अपडेट करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने देखील आपण सहज कुटुंबातील सदस्याचे नाव अपलोड करू शकतो. जाणून घ्या.

हे पण वाचा:- नव्या अंदाजात दिसणार मारुतीच्या ‘या’ दमदार कार, मायलेजही मिळणार जोरदार, जाणून घ्या फीचर्स..

रेशनकार्ड अनेक ठिकाणी उपयुक्त आहे

रेशन कार्ड (Ration Card) तुमच्यासाठी पत्ता आणि ओळखपत्र म्हणूनही काम करते. अशा परिस्थितीत कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे शिधापत्रिकेवर असणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरातील पत्नीचे किंवा मुलाचे नाव रेशनकार्डवर नोंदवलेले नसेल, तर त्यांच्या नावाची नोंदणी करण्याची सोपी प्रक्रिया तुम्हाला येथे कळू शकते. त्याआधी रेशनकार्डमध्ये नाव अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे हवी आहेत हे समजून घ्या.

या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते

कुटुंबातील कोणत्याही मुलाचे नाव शिधापत्रिकेत जोडायचे (Update) असल्यास कुटुंबप्रमुखाकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. कुटुंब प्रमुखाकडे रेशनकार्डची मूळ प्रत सोबत फोटो प्रत असावी. याशिवाय, मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि त्यांच्या पालकांचे आधार कार्ड आवश्यक असेल. नवविवाहित महिलेचे नाव शिधापत्रिकेत जोडायचे असल्यास तिचे आधारकार्ड, विवाह प्रमाणपत्र आणि पालकांचे रेशनकार्डही आवश्यक असेल.

हे पण वाचा :- मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांची होणार भरती, असा करा अर्ज

घरबसल्या सहज नाव अपडेट करा

शिधापत्रिकेत नाव अपडेट(Ration Card Update) करण्यासाठी तुम्हाला खालील पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील –
सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठ्याची अधिकृत वेबसाइट उघडा.
नाव अपडेट करण्यासाठी, प्रथम वेबसाइटवर तुमचा आयडी तयार करा.
त्यानंतर Add New Member चा पर्याय शोधा आणि तो निवडा. यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल.
आता तुमचे कुटुंब तपशील येथे अपडेट करा.
फॉर्मसह, तुम्हाला कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देखील अपलोड करावी लागेल.
यानंतर, फॉर्म सबमिट केल्यावर, तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल.
तुम्ही पोर्टलवरून तुमचा फॉर्म देखील ट्रॅक करू शकता. यानंतर विभाग तुमची कागदपत्रे आणि फॉर्मची पडताळणी करेल, फॉर्म स्वीकारल्यानंतर रेशनकार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरी येईल.

हे पण वाचा :- जबरदस्त रेंज आणि फिचर्ससह लवकरच सादर होणार volvo ची ही दमदार कार..