मुंबई : ‘बिग बॉस 15’मध्ये यावेळी अनेक नाते चर्चेचा विषय बनले होते. यातच रश्मी देसाई-उमर रियाज यांचे रिलेशनशिप तर खूपच चर्चेत आले होते. मात्र, या दोघांनी वेळोवेळी ते फक्त मित्र असल्याचे स्पष्ट केले. शो संपल्या नंतरही रश्मी देसाई उमर रियाजसोबत अनेक ठिकाणी स्पॉट होते. यामुळे हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत राहतात. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या नात्याबद्दल रश्मी देसाईने मौन सोडले आहे.

या मुलाखतीत जेव्हा रश्मी देसाईला तिच्या आणि उमर रियाझच्या बाँडिंगबद्दल प्रश्न विचारला. तर उत्तर देताना रश्मी देसाई म्हणाली, “मला वाटते की उमरच्या आयुष्यात आधीपासूनच कोणीतरी आहे आणि तो त्याच्या आयुष्याबद्दल खूप वैयक्तिक आहे. आम्ही त्या सीमेचा आदर करतो. मला वाटते की लोक मला त्याच्याशी जोडतील आणि मला ते समजले आहे. मी त्याचाही आदर करते. पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.” असं रश्मी म्हणाली.

या बाँडिंगबद्दल पुढे बोलताना रश्मी देसाई म्हणाली, “आमच्यात ज्या प्रकारचे संबंध आहेत, त्यात आम्ही खूप भांडतो. प्रत्येक गोष्टीत आमच्यात मतभेद आहेत. तुम्ही नेहालाही विचारू शकता की आम्ही जेव्हाही एकत्र बसतो तेव्हा आमच्यात सर्वाधिक भांडणे होतात. आम्ही मित्र आहोतआणि खूप चांगले मित्र.” असंही रश्मी म्हणाली.

दरम्यान, ‘बिग बॉस 15’च्या फिनाले दिवशी रश्मी देसाईने तिच्यात आणि उमरमध्ये काहीही नसल्याचे स्पष्टपणे नाकारले. या शोमध्ये दोघांमधील जवळीक मात्र दिसून आली होती. या मुद्द्यावर उमर रियाझनेही मीडियाशी बोलताना रश्मी देसाई आपली फक्त मैत्रीण असल्याचे सांगितले होते. मात्र, रश्मी आणि उमर यांना सोबत बघण्यासाठी त्यांचे चाहते खुप उत्सुक आहेत. आता वेळेनुसार हे नातं कुठपर्यंत जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.