मुंबई : काही काळापूर्वी ‘तेरी मेरी कहाणी’ गाण्यात झळकलेली रोड सिंगर राणू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राणू यांचा सोशल मीडियावर एक गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ती आता एका वेगळ्या मूडमध्ये आपल्याला पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमधील शेंगा विक्रेता भुवनचे व्हायरल झालेले ‘काचा बदाम’ हे गाणं गाताना ती व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काचा बदाम या गाण्यावर रानू मंडलने आपला आवाज लावला आहे. तीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ती लग्नातील नवरीच्या वेशात आहे आणि काचा बदाम हे गाणं गाताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडीओ कुणी शूट केला आहे याची माहिती अजून समोर आली नाही पण एका ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडीओवर सध्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असून लोक तिला ट्रोल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, 2019मध्ये राणूचा गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा’ गाणं गाताना दिसली होती. तिचा हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला होता. अनेकांनी तिला मदत करण्यासाठी पुढे येण्याचीही तयारी दर्शवली. तर त्यानंतर ती अनेक रियॅलिटी शोजमध्ये दिसली होती. प्रसिद्ध गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियाने तिला त्याच्या एका चित्रपटात गाण्याचीही संधी दिली.