मुंबई : बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता रणबीर कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या इंडस्ट्रीत रणबीर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगल्या आहेत. मात्र, आलियासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी रणबीर कपूर अनेक सुंदरींच्या प्रेमात पडला आहे. यात अनेक अभिनेत्रींचेही नाव आहेत. या यादीत कोण कोण आहे? चला आपण पाहूया.

1)अवंतिका मलिक
रणबीर कपूर अवंतिका मलिकला त्याच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करण्यापूर्वीच ओळखत होता. दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते आणि काही काळ एकमेकांना डेट करत होते पण काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. तुम्हाला सांगतो की नंतर अवंतिकाने आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खानशी लग्न केले.

2)सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ चित्रपटातून पदार्पण केले. असे म्हटले जाते की, सोनम कपूर आणि रणबीर कपूर चित्रपटादरम्यान एकमेकांच्या जवळ आले पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ब्रेकअप झाले.

3)दीपिका पदुकोण
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रेम प्रकरणाची बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप चर्चा आहे. ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटाच्या सेटवर दोघेही एकमेकांना हृदय देत होते. यानंतर हे कपल उघडपणे एकमेकांसोबत दिसले. पण असं म्हटलं जातं की दीपिकानंतर रणबीरने आणखी एका सुंदरीला हृदय दिलं होतं आणि त्यानंतर हे जोडपं कायमचं वेगळं झालं.

4)कतरिना कैफ
बी टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध प्रेमकहाणी म्हणजे रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांची. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या सेटवर त्यांचे प्रेम फुलले. दोघेही स्टार्स लिव्ह इनमध्ये एकत्र राहत होते. रणबीर कपूर कतरिना कैफबाबत खूप गंभीर होता, असे म्हटले जाते. हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले होते, मात्र काही कौटुंबिक वादामुळे त्यांचे नाते पुढे गेले नाही.