मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांच्या लग्नाच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हे कपल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करतील असे म्हंटले जक्त होते तर त्यानंतर असं समोर आलं की डिसेंबर नाहीतर एप्रिलमध्ये दोघांचं लग्न होऊ शकतं. या तारखांच्या चर्चा होत असतानाच आलिया-रणबीरच्या लग्नसंबंधीत रणबीर कपूरची मावशी रिमा जैन मोठा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिमा जैनने एप्रिलमध्ये होणाऱ्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. रीमा जैन म्हणाल्या, “मला यावेळेस काहीच माहिती नाही. दोघेही लग्न करणार पण कधी हे माहीत नाही. जेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांना कळेल.”

पुढे त्या म्हणाल्या की, “असे काही नाही. आम्ही दोन्ही घरांनी कोणतीही तयारी केली नाही, मग इतक्या लवकर लग्न कसे होणार. जर या सर्व गोष्टी खऱ्या असत्या तर त्या ऐकून मी स्वतः आश्चर्यचकित झाले असते का?” असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोन्ही स्टार्सचा हा चित्रपट 2022 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.