मुंबई : आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद रोज कोणता ना कोणता वेगळा लूक करून मिडियासमोर येते. तिच्या या अतरंगी लूकसोबतचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. दरम्यान उर्फी तिच्या या स्टाईलसोबत पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. मात्र, यावेळी खास गोष्ट अशी की तिच्या सोबत यावेळी राखी सावंत दिसत असून ती उर्फीचे कौतुक करत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, राखी सावंत घरातून बाहेर पडल्यावर उर्फी जावेदला भेटते. यावेळी उर्फीचा ड्रेस पाहून तिला धक्काच बसतो. ती उर्फीला विचारते की ती तीच्या घराशेजारी काय करत आहे? आणि म्हणते उर्फी आग लावतिये इथे सगळ्या बिल्डिंगमध्ये. राखीचे हे बोलणे होताच यावर उत्तर देताना उर्फी म्हणते की, मी तुला माझं हृदय द्यायला आली आहे. यावर राखी म्हणते की, उर्फीचे हृदय खुपच मोठे आहे. राखी हे बोलताच उर्फी आणि तिने उपस्थित फोटोग्राफर्स हसायला लागतात.

दरम्यान, यावेळी उर्फी रेड कलरच्या मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यासोबत उर्फीने रेड कलरच्या हाय हिल्सही कॅरी केल्या आहेत. तर राखीने यावेळी कॅज्युअल सूट घातलेला दिसत आहे. या दोघींचा हा गंमतशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.