मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीव्हीचे लोकप्रिय कपल अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांच्या ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. यावर शमिता शेट्टीने आपली प्रतिक्रिया देत व्हायरल बातम्यांचे खंडन केले होते. यात आता राकेश बापटनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शमिता आणि राकेश बिग बॉस ओटीटी पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेक ठिकाणी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत होते. मात्र, अचानक त्यांच्या ब्रेकअप झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यावर राकेशनं अशाप्रकारे बातम्या व्हायरल करणाऱ्य़ांना चांगलेच झापले आहे.

तो म्हणाला, “ती माझी चांगली मैत्रीण आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, शमिता सारखी मुलगी माझी सगळयात जवळची मैत्रीण आहे. तुमची मैत्री एवढी घनिष्ठ हवी की, आणखी कशानं त्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडता कामा नये. मी त्याला फक्त एक नातं असं म्हणणार नाही. तर त्याला बाँड असे म्हणेल. तो जपण्याचा दोघांकडून प्रयत्न व्हायला हवा.” असं राकेश म्हणाला.