rajstahn royals
Rajasthan Royals player criticizes new IPL rules

नवी दिल्ली : अलीकडेच एमसीसी (MCC) ने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. एमसीसीने नवीन नियमांमध्ये कॅच आऊट ते रन आऊट, अशा काही नियमांमध्ये बदल केले आहेत. यासोबतच एमसीसीने मांकडिंगबाबत मोठा निर्णय दिला आहे. तसेच कॅच आऊटबाबतचेही नियम बदलण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, जर एखादा फलंदाज झेलबाद झाला तर त्याच्या जागी फक्त नवीन फलंदाज येईल, जरी दोन्ही फलंदाजांनी स्ट्राइक बादलेली असली तरीही.

हे सर्व नियम ऑक्टोबर 2022 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपासून लागू होणार असले तरी इंडियन प्रीमियर लीग गव्हर्निंग कौन्सिलने या सीझनपासून हे नियम लागू करण्याचे मान्य केले आहे.

यावरच आता न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशमनं या नियमांबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. निशमने ट्विट केले की, “मला खरोखर हे समजले नाही. या नियमात कधी अडचण आली आहे का? त्याचवेळी, मॅचच्या परिस्थितीबाबत जागरूक असलेल्या बॅटरला याचा फायदा होईल. असे ट्विट करत त्याने बदलेल्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

इंग्लंडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या द हंड्रेड स्पर्धेत हा नियम लागू करण्यात आला. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये बॉलर्सला फायदा मिळावा, असा या नियमाचा उद्देश आहे. या नियमानुसार कॅच आऊट झाल्यानंतर नवा खेळाडू स्ट्राईकवर येईल. त्या परिस्थितीमध्ये मैदानात सेट असलेल्या बॅटरपेक्षा नवा खेळाडू आक्रमक शॉट लगावण्याची शक्यता कमी आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या या मोसमात अष्टपैलूजिमी निशमनं राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. जिमी निशमनंने 2014 साली दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी लीगमध्ये पदार्पण केले आणि तो गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळला. पंजाब किंग्जकडूनही तो मैदानात उतरला आहे. नीशमचा हा चौथा आयपीएल संघ असेल. अशा स्थितीत निशमनंडून राजस्थान रॉयल्सला मोठ्या अपेक्षा आहेत.