Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

पुणे वेधशाळेचा नवीन हवामान अंदाज आला! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पडणार मुसळधार पाऊस, पहा काय म्हणतय हवामान विभाग

0

Pune Weather Department : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस होत आहे. एवढेच नाही तर राज्यातील काही भागांमध्ये गारपीट देखील झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात असे नुकसान झाले आहे.

प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक भागांमधील शेतकऱ्यांचे गारपिटीने मोठे नुकसान केले आहे. परिणामी आता अवकाळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार हा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, अवकाळी पाऊस कधीपर्यंत सुरू राहील याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

पुणे वेधशाळेने अवकाळी पावसा संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन ते चार दिवसांपासूनची अवकाळी पावसाची परिस्थिती आगामी काही दिवस अशीच कायम राहणार आहे.

राज्यात आणखी तीन दिवस अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज पुणे वेधशाळेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. यामुळे अवकाळी पावसाचा धोका तुर्तास टळलेला नाही याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यायची आहे.

पुणे वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे आज राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ विभागात आज दिवसभर विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आजसाठी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील दिला गेला आहे.

म्हणजे काही भागात आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर राज्यातील काही भागांमधून आता पावसाची तीव्रता कमी होत जाणार आहे. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी दोन ते तीन दिवस पाऊस सुरूच राहणार आहे.

यामुळे मराठवाड्यासाठी पुणे वेधशाळेने येलो अलर्ट दिला आहे. यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आगामी काही दिवस आपल्या शेती पिकांची आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.