पुणेकरांसाठी गुड न्यूज ! दिवाळीच्या सणाला ‘या’ शहरासाठी सुरू होणारे स्पेशल ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक?
Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा आनंददायी पर्व सुरू आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यात दिवाळीचा देखील सणं सेलिब्रेट केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते.
सणासुदीला रेल्वेमध्ये गर्दी वाढते. यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. हेच कारण आहे की, पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने पुणे ते अमरावती दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिवाळीच्या काळात आठ गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या आठ गाड्यांपैकी चार गाड्या पुणे ते अमरावती आणि चार गाड्या अमरावती ते पुणे अशा धावणार आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात पुणे ते अमरावती आणि अमरावती ते पुणे हा प्रवास गतिमान होणार आहे. खरंतर, अमरावतीसह संपूर्ण विदर्भातून पुण्याला कामानिमित्त, व्यापारानिमित्त तसेच शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
विदर्भातील नागरिक पुण्यात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. दरम्यान पुण्यात स्थायिक झालेले हे विदर्भवासी सणासुदीला गावाकडे जाणार आहेत. आता याच लोकांसाठी मध्य रेल्वेने पुणे ते अमरावती दरम्यान आठ गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपण पुणे ते अमरावती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या स्पेशल गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01209 MEMU स्पेशल ट्रेन अमरावती ते पुणे दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी 05.11.2023 ते 19.11.2023 या कालावधीत चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी या कालावधीत दर रविवारी आणि बुधवारी म्हणजे आठवड्यातून दोनदा चालवली जाणार आहे.
या काळात ही स्पेशल गाडी अमरावती रेल्वे स्टेशनंवरून 12.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पावणे तीन वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच पुणे ते अमरावती दरम्यान गाडी क्रमांक 01210 MEMU स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी दर 06.11.2023 ते 20.11.2023 या कालावधीत दर गुरुवारी आणि सोमवारी म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी पुणे रेल्वे स्टेशन या काळात सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे आणि आणि त्याच दिवशी ही गाडी 19.50 वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा देणार
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे पुणे ते अमरावती दरम्यान चालवली जाणारी ही स्पेशल गाडी या रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे. ही गाडी बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.