Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

पुणे-हिंजवडी मेट्रो मार्ग केव्हा सुरू होणार ? पीएमआरडीएच्या आयुक्तांनी थेट तारीखच सांगितली, पहा…

0

Pune Metro : शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रो मार्ग विकसित केले जात आहेत. आतापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गावर मेट्रो सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट याचा विस्तारित टप्पा अर्थातच सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गाचा विस्तारित टप्पा अर्थातच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गावर देखील लवकरच मेट्रो सुरु केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गावर डिसेंबर 2023 पर्यंत मेट्रो धावू शकणार आहे. परंतु सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग एप्रिल 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग महामेट्रोच्या माध्यमातून विकसित केले जात आहे.

अशातच आता पुणेरी मेट्रो संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. पुणेरी मेट्रो मार्ग हा पीएमआरडीएच्या माध्यमातून विकसित केला जात आहे. पुणेरी मेट्रो अंतर्गत पुणे ते हिंजवडी-माण दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे आयटी हब म्हणून वेगाने विकसित झालेल्या हिंजवडी शहरासोबत पुण्यातील मध्यवर्ती भागाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

हिंजवडीमध्ये रोजाना कामानिमित्त जाणाऱ्या मध्यवर्ती भागातील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, हा मेट्रो मार्ग केव्हा सुरू होणार हा प्रश्न हिंजवडी आणि पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान याचे उत्तर पीएमआरडीएच्या आयुक्तांनीच दिले आहे. पी एम आर डी ए चे आयुक्त राहुल महीवाल यांनी सकाळी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत पुणेरी मेट्रोचे 46% एवढे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे त्या 16 ते 17 महिन्यात या मार्गाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.

या मार्गाचे बाकी असलेले 54% काम येत्या 16-17 महिन्यात पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. या मेट्रोची लांबी २३ किलोमीटर असून या मार्गांवर २३ थांबे राहणार आहेत. या प्रकल्पाचे काम पीपीपी तत्त्वावर टाटा समूहाकडून करून घेतले जात आहे. ३५ वर्षांनंतर हा प्रकल्प टाटा समूहाकडून ‘पीएमआरडीए’ला हस्तांतरित केला जाणार आहे.